वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरवात करणारऱ्या स्मिता तळवलकर यांनी नंतर अभिनेत्री, रंगकर्मी, निर्माती आणि दिग्दर्शन अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला. गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी त्या झुंज देत होत्या. त्यांच्या 'कळत नकळत' (१९८९), आणि 'तू तिथे मी' (१९९८) या चित्रपटांमधील अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरव झाला. 'सवत माझी लाडाची' हा स्मिता यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. 'कळत नकळत', 'चौकट राजा', 'तू तिथे मी' , 'सातच्या आत घरात' , 'आनंदाचे झाड' असे दर्जेदार सिनेमे आणि २५ मालिका मराठी रसिकांना देणाऱ्या स्मिता तळवलकर यांच्या निधनाने मराठी नाट्य - चित्रपट सृष्टी आज जणूकाही पोरकी झालीये.

0 comments:

Post a Comment

 
Top