"अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यक्तींसाठी शासनाच्या योजना राबविताना होत असलेला अन्याय" या नियम 293 अन्वयेच्या प्रस्तावावर दि. 13 एप्रिल, 2011 रोजी श्री.एकनाथराव गणपतराव खडसे (पाटील) (विरोधी पक्षनेते) यांचे भाषण
अध्यक्ष महोदय, राजपूत भामटा समाजाच्या बाबत
देखील असाच प्रकार आहे. मोठया प्रमाणात हा समाज आहे. हा भटका समाज आहे. त्यांचा देखील व्हीजेएनटीमध्ये समावेश करावा, अशी
मागणी केली जात आहे. मागील कालखंडामध्ये सभागृहामध्ये या समाजाचा सहानुभूतीने विचार करु, असे आश्वासन देण्यात आले होते. माझी मागणी आहे की, राजपूत समाजाला देखील राजपूत
भामटा या समाजाचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. तसेच ठाकूर समाज पूर्वीपासून एसटीमध्ये आहे. त्यातील
काही भाग नोटीफाय केलेला आहे. 50 वर्षामध्ये
ठाकूर समाजातील काही लोक येथून दुसरीकडे स्थलांतरीत
झाले. त्यांचे जे मूळ ज्या ठिकाणी आहे, तेथील पुरावे घेऊन त्यांना जातीचे दाखले मिळाले
पाहिजेत. जर ठाकूर समाजाच्या संदर्भात ही भूमिका घेतली जात असेल की, त्या समाजाची व्यक्ती
अमुक जिल्हयात जन्माला आली असेल तरच ती एस.टी. प्रवर्गामध्ये मोडते आणि अमुक जिल्हयात
जन्माला आली असेल तर, एस.टी. प्रवर्गामध्ये मोडत नाही तर ते योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये
ज्या ज्या ठिकाणी ठाकूर समाज आहे, तो सर्वच समाज एस.टी. प्रवर्गामध्ये समाविष्ट असला
पाहिजे अशी भूमिका घेऊन त्यांना तसे प्रमाणपत्र देण्याचीही भूमिका सरकारने घेतली पाहिजे.
--**--
0 comments:
Post a Comment